महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगांव मध्ये कार्यरत असून बेळगाव, संकेश्रवर, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही या पक्षाची प्रमुख मागणी आहे. यासाठी हा पक्ष प्रयत्न करतो. १९५६च्या आधी बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकी-हुमणाबाद-संतपूर-औरादसह संपूर्ण बहुभाषक मराठी भाग महाराष्ट्र म्हणजे मुंबई राज्यात होता. १ नोव्हेंबर १९५६ ला त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी अन्यायी राज्य पुनर्रचना केली आणि आमच्या मराठी प्रदेशाला कर्नाटकात डांबण्यात आले .त्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा सामील होण्यासाठी अनेक हुतात्मे, बलिदाने, आंदोलने,लाठ्याकाठ्यांचा मार सोसणे, तुरुंगवास असे अनेक लोकशाही मार्ग अंगीकारत, आम्ही आमची सत्ता अबाधित ठेवली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. हवे तर प्रत्यक्ष पहावे. केंद्र व कर्नाटक शासन सीमाप्रश्नी जाणीवपूर्वक दुर्लक्षच करते आहे, म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कालात २९ मार्च २००४ रोजी केंद्र व कर्नाटक शासनावर सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आणि त्याची रीतसर सुनावणी चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मागील सरन्यायाधीश (निवृत्त लोढा साहेब) यांनी सीमाप्रश्नी गांभीर्याने विचार करून पुन्हा एकदा निवृत्त न्यायाधीश .मनमोहन सरीन यांच्या अधिपत्याखाली एका लवादाची नेमणूक केली आहे.आता पुढील कामकाज चालू आहे . समिती स्थानिक राजकारणात सक्रीय आहे. १९५७ साली म्हैसूर राज्याच्या निवडणूकीत समितीचे २ सदस्य (बाळकृष्ण सुंठणकर आणि लक्ष्मण बिरजे) निवडून आले होते. १९६२ साली ५, तर १९७८ मध्ये समितीचे ६ आमदार होते.२०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव-दक्षिण विभागातून समितीचे संभाजी पाटील आमदार होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सामान्यतः संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणून ओळखली जाते, ही भारतातील एक संघटना होती ज्याने 1956 ते 1960 या काळात पश्चिम भारत आणि मध्य भारतात वेगळ्या मराठी भाषिक राज्याचा पुरस्कार केला होता. समितीने मुंबई या मराठी राज्याच्या मराठी भाषिक भागातून एक नवीन राज्य निर्माण करण्याची मागणी केली, ज्याची राजधानी मुंबई शहर असेल.1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्य मराठी भाषिक राज्य म्हणून निर्माण करण्यात आले तेव्हा समितीने आपले उद्दिष्ट साध्य केले. सदस्यांनी उत्तर कर्नाटकातील बेळगाव, कारवार, धारवाड आणि बिदर या मराठी भाषिक भागांचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी वकिली सुरू ठेवली. 1967 गोवा ओपिनियन पोल पर्यंत गोवा आणि दमण या नव्याने जोडलेल्या राज्याने महाराष्ट्रात विलीनीकरण नाकारले.